काय तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात सुंदर उत्तर काय आहे ते.जगातील सर्वात सुंदर उत्तर अशी आज सर्वत्र चर्चा आहे ते उत्तर म्हणजे नुकत्याच चीन येथे पार पडलेल्या जागतिक विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये भारतीय विश्वसुंदरी manushi chhillar हिला प्रश्न विचारण्यात आला आणि त्या प्रश्नाचे तिने जे उत्तर दिले ते उत्तर तिला जागतिक सुंदरी ठरवण्यासाठी कारणीभूत ठरले म्हणून ते उत्तर जगातील सर्वात सुंदर आहे .काय होते ते उत्तर म्हणून त्याला जास्त मान मिळून त्या सुंदरीला विश्वसुंदरी हा मान मिळाला ? हे उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कदाचित कारण ते उत्तरच अश्या व्यक्तीची निगडित होते की ती व्यक्ति सर्वांना प्रिय असते. तिला विचारलेला प्रश्न असा होता की जगात सर्वात जास्त पगार कोणाला असावा आणि त्यावर तिने उत्तर दिले जगात सर्वात जास्त पगार हा आईला असावा आणि तिचे हे उत्तर सर्वांना भुरळ घालणारे ठरले आणि जागतिक सुंदरी किंवा विश्वसुंदरीचा मुकुट तिच्या शिरपेचात आला . या शब्दांच्या ऐवजी तिने कोणताही शब्द वापरला असता तरीसुद्धा उत्तर इतके सुंदर झाले नसते .
आई या शब्दातच इतकी जादू आहे की या उत्तरामुळे ती संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा