सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९
दसर्याला सोने म्हणून वाटले जाणाऱ्या आपट्याच्या पानाचे धार्मिक महत्त्व
आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे.आपट्याचे अश्मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
