शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

यशवंतराव बळवंतराव चव्हाण






 (मार्च १२इ.स. १९१३:कराडमहाराष्ट्रनोव्हेंबर २५इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुध्दा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
यशवंतराव बळवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण






















जीवनसंपादन करा



इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधानपंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधानकेंद्रीय गृहमंत्रीअर्थमंत्रीसंरक्षणमंत्रीपरराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

चंपाषष्ठी





मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्यकरून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.
मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेचखंडोबाच्या अन्य देवळांतही |खंडोबाचा उत्सव असतो.
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे . मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात . [१]
मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावलीकिंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

Satyashodhak Samaj






सप्टेंबर २४इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली
पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरुन सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते.
  • 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.
  • सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.
  • 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.
  • सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
  • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
  • त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.
  • समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

भारतातील पहिल्या महिला प्रॅक्टिशनर डॉक्टर रखमाबाई भिमराव राऊत यांचे विषयी तुम्हाला हे माहीत आहे का?

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आपण आनंदीबाई जोशी यांना ओळखतो परंतु भारतातील पहिल्या महिला  प्रॅक्टिशनर डॉक्टर म्हणून आपण रखमाबाई भीमराव राऊत यांना ओळखतो. आज त्यांची 153 विनंती म्हणून गूगलने त्यांचा doodle द्वारे सन्मान केला आहे रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला. आई विधवा होती व त्या वेळेसच्या प्रथेनुसार रखमाबाई यांचे वयाच्या अकराव्या वर्षीच 19 वर्ष  वय असलेल्या दादाजी भिकाजी यांच्याबरोबर लावण्यात आले. तीचे लग्न लावून देण्यात आले परंतु लग्नानंतर सासरी न राहता आईकडेच राहिल्या व त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले.मेडीकलची डिग्री घेण्यासाठी त्या इंग्लंडमध्ये गेल्या मेडिकल कॉलेजमध्ये डेडबॉडी  त्यांनी पहिल्या वेळेस पाहिले त्यावेळेस त्यांना अगदी उलटी आली त्यांना ती सहन झाले नाही परंतु नंतर त्यांनी धैर्याने सर्व गोष्टी शिकवून आपली डिग्री पूर्ण केली आपल्या पतीबरोबरच कायदेशीर लढाई मध्ये त्याकाळीही त्या लढल्या आणि अशा या जिद्दी स्त्री चा वयाच्या नव्वदाव्या वर्षी 1955 मध्ये मुंबईमध्ये निधन झाले. ज्या काळात महिलांना फक्त चूल आणि मूल अशीच कामे होती अशा काळातही संघर्षमय जीवन जगणाऱ्या रखमाबाई यांना सलाम.

ही पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करावि.

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

जगातील सर्वात सुंदर उत्तर





























काय तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात सुंदर उत्तर  काय आहे ते.जगातील सर्वात सुंदर उत्तर अशी आज सर्वत्र चर्चा आहे ते उत्तर म्हणजे नुकत्याच चीन येथे पार पडलेल्या जागतिक विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये भारतीय विश्वसुंदरी manushi chhillar हिला प्रश्न विचारण्यात आला आणि त्या प्रश्नाचे तिने जे उत्तर दिले ते उत्तर तिला जागतिक सुंदरी ठरवण्यासाठी कारणीभूत ठरले म्हणून ते उत्तर जगातील सर्वात सुंदर आहे .काय होते  ते उत्तर म्हणून त्याला जास्त मान मिळून त्या सुंदरीला विश्वसुंदरी हा मान मिळाला ? हे उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कदाचित कारण ते उत्तरच अश्या व्यक्तीची निगडित होते की ती व्यक्ति सर्वांना प्रिय असते. तिला विचारलेला प्रश्न असा होता की जगात सर्वात जास्त पगार कोणाला असावा आणि त्यावर तिने उत्तर दिले जगात सर्वात जास्त पगार हा आईला असावा आणि तिचे हे उत्तर सर्वांना भुरळ घालणारे ठरले आणि जागतिक सुंदरी किंवा विश्वसुंदरीचा मुकुट तिच्या शिरपेचात आला . या शब्दांच्या ऐवजी तिने कोणताही शब्द वापरला असता तरीसुद्धा  उत्तर इतके सुंदर झाले नसते .
आई या शब्दातच इतकी जादू आहे की  या उत्तरामुळे ती संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाली.